टायटन्स् पब्लिक स्कुल येथे देशभक्तीचा जल्लोश

टायटन्स् पब्लिक स्कुल येथे झाला देशभक्तीचा जल्लोश

शानदार उद्घाटन संपन्न

एक्स्प्रेशन्स चे झाले उद्घाटन

विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी द्वारा संचालित टायटन्स् पब्लिक स्कुल येथे भव्य सोहळ्याचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष मा. प्रा. विनय गोहाड, कोषाध्यक्ष मा. पकंज देशमुख, सचिव मा. युवराजसिंग चौधरी कार्यकारी सदस्य मा. अॅड. उदय देशमुख, मा. प्रा. हेमंत देशमुख, मा. नितीन हिवसे, मा. प्रा. गजानन काळे, मा. प्रा. सौ. रागिणीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनात व शाळेच्या प्राचार्या श्वेता पैठणकर यांच्या नेतृत्वात पार पडले. या सोहळ्याला अखिल भारतीय आंतकवादी विरोधी मोर्चाचे अध्यक्ष जिंदा शहिद मनिदंरजीतसिंग बिट्टा यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हाधिकारी श्री. किरण गिते, मुख्य वन संरक्षक संजय गौड, पोलीस उपायुक्त दत्तात्रय मंडलीक, यांची प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. जिंदा शहिद बिट्टा यांचे आगमन होताच प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गायन केले. त्यानंतर संस्थेच्या वतीने जिंदा शहिद बिट्टा यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. नितीन धांडे यांचे हस्ते करण्यात आला. शाळेच्या प्राचार्या श्वेता पैठणकर यांनी शाळेचा प्रगती अहवाल वाचुन दाखविला. त्यामध्ये शाळेने केलेल्या प्रगती बद्दल त्यांनी पाहुण्यांना व प्रेक्षकांना सांगितले. संस्थेचे कार्यकारी सदस्य प्रा. हेमंत देशमुख यांनी मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे सचिव मा. श्री. युवराजसिंग चौधरी यांनी संस्थेबद्दल माहिती व मार्गदर्शन केले, संस्थेचे कोषाध्यक्ष मा. श्री. पकंज देशमुख, जिल्हाधीकारी मा. श्री. किरण गिते, मुख्य वनसंरक्षक संजय गौड यांनी व संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. विनय गोहाड यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर जिंदा शहिद बिट्टा यांचे भाषण सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून व उभे राहुन वंदे मातरम्, भारत माता की जय म्हणुन त्यांचे स्वागत केले. आपल्या भाषणात देशभक्ती ही एक भावना आहे. राष्ट्र निर्मीतीसाठी देशसेवेचा भाव असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भगतसिंग, राजगुरु त्यांच्या गोष्टी लहानपनापासुन ऐकत असून त्यामुळे देश प्रेमाची व देश सेवेची प्रेरणा मिळाली बोलतांना त्यांना गहिवर आला. नोटबंदीमुळे आतंकवादाचे कंबरडे मोडल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले. या प्रसंगी बिट्टा यांच्या जिवनावर जिवनपट दाखविण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. नितीन धांडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच आभार प्रदर्शन शाळेच्या प्राचार्य श्वेता पैठणकर यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. वैशाली धांडे, सौ. माधुरी गोहाड, सौ. माधवी देशमुख, सौ. पुनम चौधरी, सौ. मायाताई हिवसे, सौ. वर्षा देशमुख, सौ. शिल्पा काळे, प्रो. राम मेघे प्रो. राम मेघे इंन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेरा-अमरावतीचे प्राचार्य डॉ. निशीकांत काळे, प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरींग अॅन्ड मॅनेडमेंट, बडनेरा-अमरावतीचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली, तंत्रनिकेतन बडनेराचे प्राचार्य राजेश देशमुख व दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राम ठोबंरे बॅ. आर.डी.आय.के. अॅन्ड एन.के.डी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश देशमुख, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय अमरावती येथील प्राचार्य डॉ. आशा बोरकर व मोठ्या प्रमाणात विभाग प्रमुख, प्राध्यापक व पालक व विद्यार्थी उपस्थित होते.